टेस्ला भारतात कधी येणार याचे मस्क नी दिले उत्तर

अमेरिकन इलेक्ट्रिक कार टेस्ला २०२१ मध्ये भारतीय बाजारात नक्की येईल असे संकेत टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी ट्विटरवरील एका पोस्टला उत्तर देताना दिले आहेत.

शुक्रवारी ट्विटरवरून एका टीशर्टचा फोटो पोस्ट केला गेला होता. त्यावर इंडिया वॉन्टस टेस्ला अशी अक्षरे होती. त्याला रिप्लाय करताना मस्क यांनी ‘नेक्स इअर शुअर, थँक्स फोर वेटिंग’ असे उत्तर दिले आहे. भारतात ऑटो विभागाला मंदीचा फटाका बसला असतानाच करोना मुळे या क्षेत्राची परिस्थिती आणखी खालावली आहे. मात्र गेल्या एक दोन महिन्यात त्यात सुधारणा होत असल्याचे संकेत मिळाले आहेत.

ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्स नुसार मस्क जगातील सहा नंबरचे श्रीमंत आहेत तर धनकुबेराच्या फोर्ब्सच्या यादीत मस्क आठ नंबरवर आहेत. मस्क यांच्या संपत्तीत सतत वाढ होताना दिसते आहे. यंदा त्याची संपत्ती ५७.२ अब्ज डॉलर्सवर गेली आहे.