अमेरिकेत हाय अॅलर्ट – परमाणु हल्ला विमानांची गस्त सुरु

फोटो साभार इम्पर्णीटी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलेनिया याना करोना झाल्यामुळे आर्मी हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यानंतर रक्षा मंत्रालयाने देशभर हाय अॅलर्ट लागू केला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी परमाणु हल्ला योजना लाँच केली गेली आहे. न्युक्लिअर डूम्स डे प्लॅन च्या विमानांनी सीमांवर गस्त सुरु केली असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्राध्यक्षांशी सार्वजनिक संपर्क नसेल तेव्हा ही योजना कार्यान्वित केली जाते. देशाच्या या परिस्थितीत शत्रूने अचानक हल्ला करू नये म्हणून ही योजना राबविली जाते.

या योजनेतून राष्ट्राध्यक्ष अनुपस्थित असले तरी देशाच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण झाला तर शत्रूला त्याचे सडेतोड उत्तर दिले जाईल असा संदेश दिला जातो. या योजनेखाली अमेरिकी हवाई क्षेत्रात दोन ई-६८ मर्क्युरी विमाने सतत गस्त घालू लागली आहेत. या विमानांना बोईंग ७०७ ची चार इंजिन असून अमेरिकी नौसेना परमाणु बॅलेस्टिक मिसाईल पाणबुड्या ताफ्याचा या विमानांशी सतत संपर्क असतो. शत्रू कोणत्याही प्रकारे हल्ला करणार असले तर तशी सूचना ही विमाने नौसेना पाणबुडी ताफ्याला देतात आणि या पाणबुड्या शत्रूला निशाना बनवून त्याच्यावर मिसाईल डागतात.

अमेरिकी नौसेनेकडे अश्या प्रकारची १६ गस्ती विमाने आहेत. यापूर्वी एकाच वेळी दोन विमानांनी गस्त घातल्याचा प्रकार घडला नव्हता. एकच विमान एका वेळी गस्त घालत असे असे सांगितले जात आहे.