स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस एक्स्प्रेस’ची पहिली तुकडी रुळावर


आसनसोल: पूर्णतः भारतीय बनावटीच्या ‘तेजस एक्सप्रेस’ या रेल्वे इंजिनाची पहिली तुकडी रुळावर दाखल झाली आहे. येथील रेल्वे स्थानकात इंजिनाच्या शिल्पकारांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ‘तेजस’चे उदघाटन करण्यात आले.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या ‘तेजस’चे उत्पादन प. बंगालमध्ये ‘चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स’ येथे करण्यात आले आहे. रेल्वेच्या सेवेत दाखल झालेल्या पहिल्या इंजिनाला कंपनीचे सरव्यवस्थापक प्रवीण कुमार मिश्रा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. रेल्वेला पुढे खेचण्यासाठी आणि मागून पुढे ढकलण्यासाठीही या इंजिनाचा उपयोग करता येणार आहे. इंजिनाचा वेग तशी १६० किलोमीटर आहे.

‘तेजस’च्या रूपाने देशाने ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे, अशा शब्दात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या इंजिनाचे स्वागत केले आहे. स्वदेशी बनावटीचे इंजिन अत्याधुनिक स्वरूपाचे आणि ऊर्जेची बचत करणारे आहे, अशी माहिती त्यांनी ‘ट्विटर’द्वारे दिली आहे