नवी दिल्ली: जगातून आण्विक अस्त्रांचे उच्चाटन करण्यासाठी भारताचा पाठींबा असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी जाहीर केले.
अण्वस्त्रांच्या उच्चाटनासाठी भारताचा पाठींबा
दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अण्वस्त्रांद्वारे हल्ला केला. त्याचे पिढ्यानपिढ्या भोगावे लागलेले परिणाम पाहता जगभरातून अण्वस्त्रांना विरोध व्यक्त होऊ लागला. संयुक्त राष्ट्रसंघाने सातत्याने अण्वस्त्रमुक्त जगाची भूमिका मांडली आहे.
अण्वस्त्रांच्या निरमिलनासाठी भारत कटिबद्ध असून भारताने त्यासाठी नेहेमीच पुढाकार घेतला आहे. अण्वस्त्र निर्मूलनासाठी व्यापक पातळीवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. जगाच्या समृद्धी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अण्वस्त्र निर्मूलन हा प्राधान्याचा विषय आहे हीच भारताची आग्रही भूमिका आहे, असे शृंगला यांनी नमूद केले.