मिनी कन्व्हर्टीबल भारतात आली, फक्त १५ युनिट विकली जाणार

फोटो साभार ऑटोकार

जर्मन ऑटो कंपनी बीएमडब्ल्यूने त्यांची एक खास कार मिनी कन्व्हर्टीबल साईडवॉक एडिशन भारतात १ ऑक्टोबर रोजी लाँच केली आहे. या कारची किंमत ४४.९० लाख असून येथे तिची १५ युनिट विकली जाणार असल्याचे समजते. या कारची खास बात म्हणजे टी २००७ साली लाँच झालेल्या कारचे अपग्रेडेशन आहे. मात्र तिच्या लुक आणि डिझाईन मध्ये खूप बदल केले गेले आहेत.

शॉप डॉट मिनी डॉट इन येथे या कारसाठी बुकिंग सुरु झाले आहे. ही कार ब्रिटन मध्ये बनवून भारतात आणली जाणार आहे. तिचे इलेक्ट्रिक रुफ २० सेकंदात दुमडता येते. कारच्या बाहेरच्या रुपड्याइतकेच केबिन डिझाईन सुद्धा आकर्षक बनविले गेले आहे. कारला मल्टीफंक्शनल स्टिअरिंग, अल्युमिनियम दरवाजे, साईडवॉक डिझाईन व स्ट्राईप बोनेट दिले गेले आहे.

२.० लिटरचे चार सिलिंडर ट्विन टर्बो इंजिन असून १०० किमीचा वेग पकडण्यास या कारला ७.१ सेकंड लागतात. तिचा सर्वाधिक वेग ताशी २३० किमी आहे. कारला ७ स्पीड स्पोर्ट ट्रान्समिशन युनिट दिले गेले आहे. ग्राहक त्याच्या गरजेनुसार ही कार कस्टमाईज करून घेऊ शकणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने पुढच्या मागच्या सीटसाठी एअरबॅग्ज, ब्रेक असिस्टन्ट, डीएससी, क्रॅश सेन्सर, एबीएस कॉर्नरींग ब्रेक कंट्रोल, सीट बेल्ट्स दिले गेले आहेत. आतल्या बाजूला एलईडी लाईट असून त्यामुळे ड्रायव्हिंग साईड उघडली की लोगो जमिनीवर दिसतो.