प्राण्यांच्या रक्तापासून होणार कोरोनावर उपचार -‘आयसीएमआर’
नवी दिल्ली: काही खास विषाणूंशी लढण्यासाठी प्राण्यांच्या रक्तात असणाऱ्या घटकांपासून ‘आयसीएमआर’ आणि हैदराबाद येथील ‘बायोलॉजी ई’ या फार्मा कंपनीच्या संयुक्त प्रकल्पात प्रतिजैविक विकसित करण्यात आले आहे. इंजेक्शनद्वारे हे प्रतिजैविक रुग्णाला दिले जाऊ शकते.
प्राण्यांच्या रक्तामध्ये काही विशिष्ट रोगांशी लढण्यासाठी प्रतिजैविके तयार होतात. त्या प्रतिजैविकांचा उपयोग करोनाशी लढण्यासाठी करता येऊ शकतो. ही शक्यता विचारात घेऊन भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर) आणि ‘बायोलॉजी ई’ च्या संयुक्त प्रयत्नातून हे औषध विकसित करण्यात आले आहे.
करोनाशी लढण्यासाठी औषधे आणि लस विकसित करण्यासाठी जगभर प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु आहे. अशा परिस्थितीत ‘आयसीएमआर’ची ही कामगिरी करोना विरोधी लढ्यातील एक महत्वाचे पाऊल ठरू शकणार आहे.