पहिल्या आवृत्तीतील दुर्मीळ ‘हॅरी पॉटर’ लिलावात,अपेक्षित किंमत २९ ते ४७ लाख रुपये

मुलाला वाचनाची गोडी लागावी म्हणून आणलेल्या पुस्तकांना लिलावात मिळू शकणाऱ्या लाखो रुपये किमतीने ‘त्यांना’ आश्चर्यचकीतच केले. इंग्लंडमधील हवाई वाहतूक क्षेत्रातून निवृत्त झालेल्या व्यक्तीने आपल्या मुलासाठी सन १९९९ मध्ये हॅरी पॉटर आणि फिलॉसॉफर्स स्टोन ही पुस्तके विकत घेतली. ही दोन्ही पुस्तके पहिल्या आवृत्तीतील असून दुर्मीळ आहेत. या पुस्तकांना हजारो पाउंड, अर्थात लाखो रुपयांची किंमत मिळूशकते हे समजताच त्यांना धक्काच बसला.

‘हॅरी पॉटर’ या पुस्तकाची पहिली पुट्ठे बांधणीची आवृत्ती केवळ ५०० पुस्तकांची होती. ती सन १९९७ मध्ये प्रसिद्ध झाली. सध्या दुर्मीळ झालेलय या पुस्तकाचा ‘हॅन्सर ऑक्शनिअर्स’ मार्फत दि. १३ ऑकटोबर रोजी लिलाव केला जाणार आहे. अपेक्षित किंमत आहे साडे अठ्ठावीस लाख रुपये! मात्र, हे पुस्तक सुस्थितीत असल्याने त्याला तब्बल साडेसत्तेचाळीस लाखांची किंमतही मिळू शकते.

आपल्याकडे असलेली पुस्तके इतकी किमती आहेत याची मला कल्पनाही नव्हती. मी घेतलेले पुस्तक प्रसिद्ध होताच लगेच विकत घेतलेही नव्हते. मात्र, ‘हॅन्सर’ मार्फत पहिल्या आवृत्तीतील ‘हॅरी पॉटर’ पुस्तकाचा लिलाव झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मी कंपनीचे ग्रंथ तज्ज्ञ जिम स्पेन्सर यांची भेट घेऊन त्यांना पुस्तक दाखविले. ते पाहून त्यांनाही धक्का बसला. हॅरी पॉटरच्या पहिल्या आवृत्तीची केवळ ५०० पुस्तके छापण्यात आली. त्यापैकी ३०० शाळा, वाचनालयांकडे आहेत. उरली केवळ दोनशे. त्यापैकी या वर्षभरात माझ्याकडे आलेले हे चौथे पुस्तक आहे. पुसटक संग्राहकांसाठी ती पवित्र ग्रंथांसारखी अमूल्य आहेत, असे स्पेन्सर म्हणाल्याचे त्या व्यक्तीने सांगितले.