नारायण राणे करोनाबाधित


कणकवली: भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना करोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे. मागील काही काळात आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महिला काही काळापासून देशातील आणि राज्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांना कोरोनाने गाठले आहे. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या पाठोपाठ राणे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

राणे हे व्यापक जनसंपर्क असलेले लोकनेते आहेत. केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर मुंबई आणि राज्यभरात त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते आहेत. त्यांच्या भोवती नेहमीच कार्यकर्ते आणि जनतेची पहायला मिळते.