भारतात उपलब्ध असलेले नॉनचायनिज बजेट स्मार्टफोन

फोटो साभार टॉप मोबाईल्स

चीनी स्मार्टफोनसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे हे खरे असले तरी आज अनेक भारतीय चीनी स्मार्टफोन साठी पर्याय शोधत आहेत असे दिसून येत आहे. चीनी स्मार्टफोन स्वस्त आणि अधिक चांगले फिचर्स असलेले आहेत त्यामुळे त्यांना ग्राहकांची अधिक पसंती आहे पण ज्यांना चीनी स्मार्टफोन घ्यायचा नाही त्यांना सुद्धा भारतीय बाजारात उत्तम फिचर्सचे स्मार्टफोन बजेट मध्ये उपलब्ध झाले आहेत. हे फोन १० हजार पेक्षा कमी किमतीत मिळत आहेत.

लावा झेड ६६ याच वर्षी ऑगस्ट मध्ये भारतीय बाजारात दाखल झालेला स्मार्टफोन. ६.०८ इंची एचडी डिस्प्ले, २.५ डी कर्व स्क्रीन, १३ व ५ एमपीचा ड्युअल रिअर कॅमेरा सेट, १३ एमपीचा फ्रंट कॅमेरा, फिंगर प्रिंट सेन्सर, फेस अनलॉक, ३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज आणि ते १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा अशी त्याची फिचर्स असून फोनची किंमत आहे ७७७७ रुपये.

सॅमसंग गॅलेक्सी एमओ १ हा फोन ६४९९ रुपयात उपलब्ध असून तो दोन स्टोरेज व्हेरीयंट मध्ये आहे. १ जीबी रॅम, १६ जीबी स्टोरेजची किंमत ५४९९ तर २ जीबी रॅम ३२ जीबी स्टोरेजची किंमत ६४९९ आहे. त्याला सजेस्ट नोटिफिकेशन फिचर आहे त्यामुळे बॅटरी लो झाली कि अलार्म वाजतो. फोनला ५ एमपीचा फ्रंट, ८ एमपीचा सेल्फी कॅमेरा असून ५.३ इंची एचडी डिस्प्ले आहे.

नोकिया सी ३ हा फोन याच वर्षी ऑगस्ट मध्ये बाजारात आला आहे. तोही दोन व्हेरीयंट मध्ये आहे. २ जीबी रॅम,१६ जीबी स्टोरेजची किंमत ७४९९ रुपये असून ३ जीबी रॅम ३२ जीबी स्टोरेजची किंमत ८९९९ रुपये आहे. त्याला ८ एमपीचा रिअर, ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा आणि अँड्राईड १० ओएस आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एमओ १ एस याचवर्षी बाजारात आला आहे. त्याला ३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज असून ६.२ इंची इन्फिनिटी व्ही डिस्प्ले, १३ + १२ एमपीचा ड्युअल रिअर कॅमेरा, ८ एमपीचा सेल्फी कॅमेरा असून त्याची किंमत आहे ९४९९ रुपये.

पॅनासोनिक इलुगा १८ फोनला ६.२ इंची डिस्प्ले, ३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज, १३ एमपीचा प्रायमरी आणि ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी फिचर्स असून त्याची किंमत आहे ८१४३ रुपये.