चालक परवाना, आरसी बुकच्या कटकटीतून मुक्तता

वाहन चालकांना आता प्रवास करत असताना वाहनचालक परवाना, गाडीचे आरसी बुक, वाहनासंदर्भातील अन्य कागदपत्रे जवळ बाळगण्याच्या कटकटीपासून मुक्तता मिळाली आहे. केंद्रीय सडक परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ मध्ये बदल केले असून त्याची अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार नवीन नियम १ ऑक्टोबर पासून लागू झाले आहेत. त्यानुसार आयटी आणि ईलेक्ट्रोनिक्स माध्यमातून वाहतूक नियम अधिक चांगल्या प्रकारे हाताळले जाणार आहेत.

नव्या नियमानुसार वाहनचालक परवाना, आरसी बुक सतत बरोबर बाळगण्याची आवश्यकता राहिलेली नाही. ही कागदपत्रे आता केंद्र सरकारच्या ऑनलाईन पोर्टल डिजिटल लॉकर किंवा एम परिवहन मध्ये सेव्ह करून ठेवणे शक्य झाले आहे. इलेक्ट्रोनिक्स माध्यमातून वैध ठरलेल्या वाहनाच्या कागदपत्राची तपासणी करण्यासाठी पोलीस मागणी करणार नाहीत. ते सर्व विवरण पोर्टल मध्ये रेकॉर्ड केले जाईल आणि वेळोवेळी अपडेट केले जाईल. कोणत्या अधिकाऱ्याने ही तपासणी केली त्याचे नावही त्यात नोंदविले जाणार आहे. यामुळे वाहनचालकाचा त्रास खुपच कमी होणार आहे.

नवीन नियमानुसार वाहन चालक नेव्हीगेशनसाठी वाहन चालविताना हातात मोबाईलचा वापर करू शकणार आहे.

————-