गुगलचे ‘पिक्सेल ५, पिक्सेल ४ ए ५ जी स्मार्टफोन बाजारपेठेत


नवी दिल्ली: गुगलने आपले पिक्सेल ५ आणि पिक्सेल ४ ए ५ जी हे दोन स्मार्टफोन्स बाजारपेठेत आणले आहेत. या दोन्ही फोन्समध्ये टायटन एम सिक्युरिटी चिप आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७६५ जी प्रोसेसर देण्यात आला आहे. दोन्ही फोन्सना ड्युएल रिअर कॅमेरा आहे.

गुगल पिक्सेल ५ ची किंमत ६९९ डॉलर (सुमारे ५१,४०० रुपये) पासून सुरू होत आहे, तर पिक्सेल ४ ए ५ जीची किंमत ४९९ डॉलर (सुमारे ३७ हजार रुपये) सुरू होते. हे दोन्ही फोन्स ५ जी नेटवर्क असलेल्या ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, जपान, तैवान, इंग्लंड आणि अमेरिका या देशांमध्ये उपलब्ध आहे. पिक्सल ४ ए ५ जी सर्वप्रथम १५ ऑकटोबर रोजी जपानच्या बाजारपेठेत पदार्पण करणार आहे. त्यानंतर तो इतर देशात उपलब्ध होईल. काळ्या आणि गुलाबी रंगात हे फोन मिळणार आहेत. हे दोन्ही फोन भारतात उपलब्ध असणार नाहीत. मात्र, गुगलचा पिक्सेल ४ ए भारतात १७ ऑकटोबरपासून उपलब्ध असेल. फ्लिपकार्टद्वारे त्याची खरेदी करता येईल.

ड्युएल सिम असलेले गूगल पिक्सेल ५ अँड्रॉइड ११ च्या प्लॅटफॉर्मवर चालतो. डिस्प्ले ६ इंच फुल एचडी+ (1080×2340 पिक्सल) आहे. पिक्सल डेन्सिटी ४३२ पीपीआय आहे आणि आस्पेक्ट रेशो १९.५.९ आहे. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ६ आणि रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज़ आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७६५ जी प्रोसेसर और ८ जीबी रॅम आहे. गूगल पिक्सल ५ मध्ये १२८ जीबी इनबिल्ट स्टोअरेज आहे. एसडी कार्डद्वारे ते वाढविले जाऊ शकते. फोटो आणि व्हिडीओसाठी गूगल पिक्सल ५ मध्ये ड्युएल रियर कॅमेरा आहे. अपार्चर एफ/१.७ बरोबरच १२.२ मेगापिक्सल आणि अपार्चर एफ/ २.२ बरोबर १६ मेगापिक्सल चे दोन सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओसाठी गूगल पिक्सल ५ मध्ये ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. फ्रंट व रियर कॅमेरा ६० फ्रेम प्रति सेकंदाने 4K व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.