कोरोना : मृतांच्या आकडेवारीवरून ट्रम्प यांनी भारतावर केला आरोप, म्हणाले…

नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडणरा आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या आधीच्या ‘प्रेसिडेन्शिअल डिबेट’ला सुरूवात झाली आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बाइडन यांच्यासोबतच्या डिबेट दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूबाबत मोठे विधान केले आहे. आपल्या संबोधनात कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत झालेल्या मृत्यूबाबत बोलताना राष्ट्रपती ट्रम्प यांनी चीन आणि अमेरिकेसह भारतावर देखील मृत्यूचे योग्य आकडे न देण्याचा आरोप केला आहे.

ट्रम्प अमेरिकेत लॉकडाऊन लावणे आणि लाखो लोकांच्या मृत्यूवर आपल्या धोरणांचा बचाव करत म्हणाले की, जर वेळेवर लॉकडाऊन लावला नसता तर यापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असता. जर आपण आपला देश सुरूच ठेवला असता तर दोन लाख नाही तर अधिक लोकांचा जीव गेला असता.

ही सर्व चीनची चूक असल्याचे म्हणत ट्रम्प म्हणाले, जेव्हा तुम्ही आकड्यांची गोष्ट करता त्यावेळी चीनमध्ये किती लोकांचा मृत्यू झाला हे तुम्हाला माहित काय माहित. रशियामध्ये किती लोक मेले आणि भारतात किती लोक मेले. हे योग्य आकडे देत नाहीत.

बाइडन यांच्यावर निशाणा साधत ट्रम्प म्हणाले की, जेव्हा मी लॉकडाऊन लावला त्यावेळी तुम्ही मला वर्णभेदी म्हटले. तुम्हाला हा चुकीचा निर्णय वाटला होता. परंतु डॉक्टर फाउजी स्वतः म्हणाल की ट्रम्प यांनी लाखो लोकांचे प्राण वाचवले. दरम्यान, अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 71 लाखांच्या पुढे गेला असून, मृतांचा आकडा देखील 2 लाखांच्या वर आहे.