ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, 400 किमीपर्यंत शत्रूवर मारा करण्याची क्षमता


सीमेवर चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आपली ताकद वाढवत आहे. आता भारताने मोठे यश मिळवले असून, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे या क्षेपणास्त्राचे अपग्रेडेट व्हर्जन आहे. हे क्षेपणास्त्र 400 किमीपर्यंत मारा करू शकते.

डीआरडीओनुसार, ही चाचणी संस्थेच्या पीजे-10 प्रोजेक्ट अंतर्गत करण्यात आली. ओडिशाच्या चंदीपूर येथे ही चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्रात वापरण्यात आलेल्या एअरफ्रेम आणि बूस्टरची निर्मिती देशातच करण्यात आलेली आहे.

ब्रह्मोसचे अपग्रेडेट व्हर्जन भारताच्या डीआरडीओ आणि रशियाच्या NPOM ने सोबत मिळून बनवले आहे. हे क्षेपणास्त्र युद्धनौका, सबमरीन, लढाऊ विमान आणि जमिनीवरून लाँच करता येते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील ट्विट करत डीआरडीओच्या यशस्वी कामगिरीसाठी अभिनंदन केले.

ब्रह्मोस एक सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे. 2005 मध्ये आयएनएस राजपूतवर भारतीय नौदलाने या क्षेपणास्त्राचे इंडक्शन केले होते. आता सर्व युद्धनौकांमध्ये या नवीन अपग्रेडेट क्षेपणास्त्राचा समावेश केला जाणार आहे. याआधी भारतीय लष्कराने देखील आपल्या तीन रेजिमेंटमध्ये या क्षेपणास्त्राचा समावेश केला आहे.