जगात सर्वात खराब कामगिरी करणारी भारताची अर्थव्यवस्था – अभिजित बॅनर्जी

नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात खराब प्रदर्शन करणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक असल्याचे म्हटले आहे. बॅनर्जी म्हणाले की, समस्या सोडवण्यासाठी सरकारने पुरेसे आर्थिक प्रोत्साहन दिलेले नाही. देशातील आर्थिक वृद्धी दरात जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत वाढ पाहण्यास मिळू शकते.

एका ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना बॅनर्जी म्हणाले की, देशातील आर्थिक वृद्धी दर कोव्हिड-19 महामारीच्या संकटामुळे आधीच मंदावला आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या अर्थव्यवस्थेपेकी एक आहे.

2021 मध्ये आर्थिक वृद्धी दर यावर्षीपेक्षा अधिक चांगला असेल. भारताचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज पर्याप्त नाही. आर्थिक पॅकेज मर्यादित होते. हे बँकांकडून एक प्रोत्साहन होते. मला वाटते की आपण काहीतरी अधिक करायला हवे. प्रोत्साहित उपायांनी कमी उत्पन्न असणार्‍या लोकांचा वापरावरील खर्च वाढला नाही, कारण सरकार या लोकांच्या हातात पैसे देण्यास तयार नव्हते, असे मत त्यांनी व्यक्त केले. जागतिक स्तरावर भारताने अधिक स्पर्धात्मक असणे आवश्यक असल्याचे देखील बॅनर्जी म्हणाले.