हाथरस प्रकरण : थोडी वाट बघा; योगींच्या राज्यात कधीही गाडी पलटते, भाजप नेत्याचा सूचक इशारा

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील 19 वर्षी युवतीवर सामुहिक बलात्काराच्या घटनेने देश पुन्हा एकदा हादरला आहे. देशभरातून या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात असून, दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. भाजपचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी न्याय मिळेल अशी व्यक्त केली आहे.

कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, थोडी वाट पाहायला हवी. योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात कधीही गाडी पलटी होती. विजयवर्गीय यांचा इशारा गँगस्टर विकास दुबेच्या एन्काउंटरकडे होता. उज्जैनवरून कानपूरला येताना गाडी पलटल्यानंतर चकमकीत विकास दुबे ठार झाला होता.

हाथरस घटनेबाबत प्रश्नविचारला असता कैलास विजयवर्गीय म्हणाले की, या घटनेत आरोपींना अटक करण्यात आले आहे. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात जात आहे. मला वाटते की थोडी वाट पाहायला हवी. मला वाटते की सर्वांना आरोपी जेलमध्ये हवे आहेत. योगीजी तेथील मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या प्रदेशात कधीही गाडी पलटते. विजयवर्गीय यांच्या सुचक वक्तव्यानंतर या घटनेतील आरोपींचा देखील एन्काऊंटर होणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आले असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याचे आदेश देखील दिले आहे. प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन केलेली समिती 7 दिवसात अहवाल देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून चर्चा करत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.