1 ऑक्टोबरपासून होणार हे मोठे बदल

1 ऑक्टोबरपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. आरोग्य विम्यात देखील मोठे बदल होणार असून, आयआरडीएच्या नियमांनुसार विमाधारकाने 8 वर्षांपर्यंत सलग विम्याचा हप्ता भरला असल्यास कंपनी कोणत्याही स्थितीमध्ये क्लेम नाकारू शकणार नाही. याशिवाय पॉलिसीमध्ये अनेक आजारांचा समावेश केला जाईल. मात्र यामुळे विम्याचा हप्ता वाढू शकतो.

Image Credited – Aajtak

उद्यापासून खुली मिठाई विक्री करताना ती कधीपर्यंत चांगली राहू शकते याची तारीख विक्रेत्यांना सांगावी लागणार आहे. खुल्या मिठाईची एक्सपायरी डेट काय असेल, याची माहिती आता द्यावी लागणार आहे. खाद्य नियामक एफएसएसएआयने (FSSAI) हे अनिवार्य केले आहे.

Image Credited – Aajtak

आयकर विभागाने सोर्सवर कर वसूलीच्या (टीसीएस) तरतुदीच्या अंमलबजावणीसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. यात ई-कॉमर्स ऑपरेटरसाठी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. यानुसार, ई-कॉमर्स ऑपरेटर 1 ऑक्टोबरपासून डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक सुविधा अथवा प्लॅटफॉर्मद्वारे वस्तू किंवा सेवांच्या किंवा दोन्हीच्या एकूण किंमतीवर एक टक्के दराने कर घ्यावा लागेल.

Image Credited – Aajtak

पुढील तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर-डिसेंबरपर्यंत स्मॉल सेव्हिंग्स स्किम्सच्या (लघू बचत योजना) व्याज दरात बदल होणार आहे. जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत व्याजदर स्थिर ठेवण्यात आले होते. सरकार दर तीन महिन्यांनी या योजनाच्या व्याजदरांचे पुनरावलोकन करत असते.

Image Credited – Aajtak

घरात वापरल्या जाणाऱ्या मोहरीच्या तेलात दुसऱ्या खाद्य तेलांची भेसळ करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बंदी घालण्यात आली आहे. एफएसएसएआईने याबाबत आदेश जारी केला आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या खाद्य सुरक्षा आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात  एफएसएसएआईने म्हटले आहे की, भारतात कोणत्याही अन्य खाद्य तेलांसोबत मोहरीच्या तेलाच्या भेसळीवर बंदी असेल.