पायल घोषच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यपला बजावले समन्स

अभिनेत्री पायल घोषने प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अत्याचाराचे आरोप करत मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आता  मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यपला समन्स बजावले आहे. अनुरागला उद्या चौकशीसाठी बोलविण्यात आल्याचे सांगितले जाते.

मुंबई पोलिसांनी अनुरागला उद्या सकाळी 11 वाजता वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले आहे. पायल घोषने अनुराग विरोधात भादवी कलम 376, 354, 341, 342 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनंतर देखील अनुराग कश्यपला अटक केले जात नसल्याचा आरोप पायल घोषने केला होता. तिने कारवाई न केल्यास उपोषण करण्याचा देखील इशारा दिला होता. काल तिने यासंदर्भात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांनी निवेदन देखील दिले. यावेळी पायल घोष सोबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील होते.