आता केवळ हात दाखवून करा पेमेंट, अ‍ॅमेझॉनने आणली भन्नाट सिस्टम

अ‍ॅमेझॉनने एक नवीन बायोमॅट्रिक पेमेंट सिस्टम लाँच करत सर्वांनाच आश्चर्यचा धक्का दिला आहे. अ‍ॅमेझॉनच्या या नवीन बायोमॅट्रिक पेमेंट सिस्टमचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही केवळ हात दाखवून कोणत्याही प्रकारचे पेमेंट करू शकता. अ‍ॅमेझॉनच्या विशेष सिस्टममुळे ऑफिस आणि स्टेडियममध्ये प्रवेश प्रक्रिया देखील सोपी होईल.

अ‍ॅमेझॉनने या नवीन बायोमॅट्रिक पेमेंट सिस्टमला अ‍ॅमेझॉन वन असे नाव दिले आहे. याद्वारे सहज कॉन्टॅक्टलेस व्यवहार करत येतील. ही सिस्टम गेटवर गेटपासचे देखील काम करेल. अ‍ॅमेझॉनचे उपाध्यक्ष दिलीप कुमार म्हणाले की, ही सिस्टम लोकांसाठी जलद, सुरक्षित आणि विश्वसनीय सिद्ध होईल.

अ‍ॅमेझॉन वन हे कोणत्याही प्रकारचे पेमेंटसाठी केवळ तळहाताचा वापर करते. यासाठी केवळ एकदा नोंदणी करावी लागेत, त्यानंतर पुढील वेळेस केवळ हात दाखवून तुम्ही व्यवहार पुर्ण करू शकता. कंपनीने म्हटले आहे की त्यांच्या स्टोर्समध्ये आता लवकरच ही सिस्टम इंस्टॉल केली जाईल.

या सिस्टममुळे कार्ड देखील जवळ बाळगण्याची गरज भासणार नाही. कंपनी या नवीन सिस्टमबाबत ग्राहकांकडून फीडबॅक घेत आहे. अ‍ॅमेझॉनच्या आधी चीनमध्ये अलीपे ने स्माइल टू पे सिस्टम सादर केली होती. यात एका डिव्हाईसमध्ये चेहरा दाखवून पेमेंट करू शकतात. मात्र या प्रकारच्या पेमेंट सिस्टममुळे प्रायव्हेसीबाबत देखील प्रश्न निर्माण होत आहेत.