जुना स्मार्टफोन विकताना घ्या ही खबरदारी

फोटो साभार सीनेट

स्मार्टफोन जुना झाला किंवा नवीन व्हेरीयंट आले की अनेक युजर जुना स्मार्टफोन विकून नवा फोन घेतात. त्यावेळी काही खबरदारी घेतली तर पश्चातापाची वेळ येणार नाही. काय घ्यायची ही खबरदारी? त्यासाठी काही टिप्स-

जुना स्मार्टफोन विकणार असला तर डेटा बॅकअप घेणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे तुमचा डेटा डीलीट किंवा लिक होणार नाही. बॅकअप घेण्यासाठी सर्वप्रथम सेटिंग मध्ये जाणून बॅकअप ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. तुमचा डेटा त्यामुळे गुगल ड्राईव्ह वर सेव होईल.

दुसरे म्हणजे फॅक्टरी रीसेट करा. फोन विकण्यापूर्वी हे काम केल्यास डेटा डीलीट होईल. त्यामुळे गुगल पासून इन्स्टाग्रामपर्यंत तुमचे जेथे कुठे आयडी असतील ते डीलिट होतील. यासाठी सुद्धा सेटिंग मध्ये जाऊन बॅकअप आणि रिसेट या पर्यायातून निवड करून क्लिक करा.

फोन विकताना तो शक्यतो ओएलएक्स किंवा क्विकर सारख्या वेबसाईटवर जाऊन विक्री करा. या साईटवर लॉग इन करून मोबाईलची माहिती द्या. येथे तुम्हाला मनासारखी किंमत मिळू शकते. ती किंमत मिळतेय असे दिसले की लगेच फोन विकून टाका.

विक्री करताना मोबाईल खरेदी बिल, अॅक्सेसरी आणि फोन बॉक्स सह विका. यामुळे तुमच्या संभावित ग्राहकावर चांगला प्रभाव पडेल आणि तुम्हाला थोडी जास्त किंमत मिळू शकेल.