कौन बनेगा करोडपती ११ मध्ये करोडपती बनले होते ३ बिहारी

फोटो साभार दैनिक जागरण

कौन बनेगा करोडपती १२ वा सिझन नुकताच सुरु झाला आहे. या खेळात अनेक उमेदवार सामील होतात आणि लाखो रुपयाची बक्षिसे जिंकून जातात मात्र करोडपती बनणारे कमी असतात. कौन बनेगा करोडपती सिझन ११ मध्ये चार करोडपती बनले होते आणि त्यातील तिघे बिहारी तर १ महाराष्ट्रीयन महिला होती याची आठवण अनेकांना असेल.

गेल्या सिझन मध्ये सर्वप्रथम करोडपती बनले बिहारच्या जहानाबाद येथील सनोज राज. त्यांनी १५ प्रश्नांची अचूक उत्तरे दिली पण शेवटच्या सात कोटी रुपये बक्षिसाच्या वेळी त्यांनी डाव सोडला. सनोज सर्वसामान्य कुटुंबातील होते.

दुसऱ्यावेळी करोडपती झाल्या महाराष्ट्र औरंगाबाद येथील बबिता ताडे. त्या शाळेत माध्यान भोजन पुरविण्याचे काम करत होत्या. अतिशय कमी पगारावर काम करणाऱ्या बबिता यांनी त्यांच्या हुशारीची चुणूक दाखविताना १ कोटी जिंकले होते. तिसऱ्या वेळी आयएएस ची तयारी करत असलेले बिहारचे गौतम झा यांनी कोट्याधीश बनण्याचा मान मिळविला होता तर चौथ्यावेळी करोडपती बनले होते बिहार पोलीस जेल सुप्रीटेंडेंट अजित कुमार. शेवटच्या प्रश्नावर त्यांनी डाव सोडला होता.