कोरोना : सीरम इंस्टिट्यूट करणार लसीच्या अतिरिक्त 100 मिलियन डोसचे उत्पादन, गेट्स फाउंडेशन देणार निधी

जगभरात थैमान घातलेले कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे. ऑक्सफोर्डच्या कोरोना प्रतिबंधक लसीची संपुर्ण जग वाट पाहत आहे. भारतात या लसीचे उत्पादन पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट करत आहे. आता सीरम इंस्टिट्यूने भारत आणि इतर गरीब देशांसाठी पुढील वर्षापर्यंत आणखी 100 मिलियन कोव्हिड लसीचे डोस तयार करणार असल्याची माहिती दिली आहे.

अतिरिक्त 100 मिलियन कोव्हिड-19 लसीचे उत्पादन करण्यासाठी सीरम इंस्टिट्यूटला बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून 150 मिलियन डॉलर्स निधी मिळणार आहे.

ऑगस्ट महिन्यात गवी आणि गेट्स फाउंडेशनसोबत झालेल्या करारानंतर 100 मिलियन लसीच्या डोसचे उत्पादन करणार असल्याची माहिती सीरम इंस्टिट्यूटने दिली होती. आता या अतिरिक्त डोसमुळे एकूण संख्या 200 मिलियन एवढी झाली आहे.