नाव न घेता पंतप्रधान मोदींनी चीनवर साधला निशाणा, म्हणाले…

 

कोरोना व्हायरसवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनवर निशाणा साधला आहे. मोदींनी आज डेनमार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांच्यासोबत डिजिटल द्विपक्षीय समेंलनादरम्यान चीनवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही, मात्र त्यांचा इशारा चीनकडे होता.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोणत्याही एका स्रोतावर जागतिक पुरवठा साखळीचे अत्यधिक अवलंबित्व धोकादायक आहे. भारत ऑस्ट्रेलिया आणि जपानसोबत मिळून पुरवठा साखळीत विविधता आणण्याचा प्रयत्न करत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी समान विचारधारा असणाऱ्या देशांचे स्वागत आहे.

नाव न घेता चीनवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, महामारीने दाखवले की कोणत्याही स्त्रोवात जागतिक पुरवठा साखळीचे अत्यधिक निर्भर राहणे धोकादायक आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस महामारीमुळे चीनमधून कंपन्या इतर देशात स्थानांतरित होत आहे अशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.