उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

उदय सामंत यांनी सांगितले की, गेले दहा दिवसमी मी स्वत: विलगीकरणात आहे. त्यामुळे मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी गेले दहा दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मी ठणठणीत असून पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याचे देखील ते म्हणाले.

याआधी राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. एकनाथ शिंदे, वर्षा गायकवाड, नितीन राऊत, विश्वजित कदम आणि सुनील केदार यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता.