मुंबईत गुंडाराज, उद्धव ठाकरे ‘जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री’, कंगनाची पुन्हा टीका
अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईमध्ये गुंडाराज सुरू असल्याचे म्हणत तिने उद्धव ठाकरे ‘जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री’ असल्याचे म्हणत जोरदार टीका केली आहे. हरियाणातील युट्यूबर साहिल चौधरीला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर कंगनाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
साहिल चौधरीला अटक केलेली बातमी शेअर करत कंगना ट्विट केले की, मुंबईता हा कसला गुंडाराज सुरू आहे ? कोणीही जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमला प्रश्न विचारू शकत नाही ? ते आपल्यासोबत काय करतील ? आपली घरे तोडतील आणि ठार करतील ? काँग्रेस यासाठी कोण उत्तरदायी आहे ?
Somebody random files a FIR against Saahil for questioning Maha Government’s work which is his democratic right and Shaahil is jailed immediately but #PayalGhosh has filed a FIR against #AnuragKashyap many days ago for rape but he is roaming free. Kya hai yeh sab @INCIndia ? https://t.co/B2S7VhlQDB
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 29, 2020
साहिल चौधरीच्या अटकेबाबत प्रश्न विचारत, कंगनाने अनुराग कश्यपवर देखील निशाणा साधला. कंगना म्हणाली की, महाराष्ट्र सरकारच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केल्यावर कोणतीही व्यक्ती अचानक साहिलच्या विरोधात एफआयआर दाखल करते, जे एक लोकशाहीच हक्क आहे आणि साहिलला त्वरित जेलमध्ये पाठवले जाते. मात्र पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल करून अनेक दिवस झाले तरीही तो सहज फिरत आहे. हे सर्व काय आहे काँग्रेस ?
दरम्यान, पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात अत्याचाराचे आरोप केले आहे. त्याच्याविरोधात कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा देखील तिने दिला आहे.