फडणवीस-राऊत भेट, चहा-बिस्किटवर अडीच तास चर्चा होत नाही – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही दिवसांपुर्वी भेट झाली होती. या भेटीनंतर राज्यात पुन्हा राजकीय भुकंप होणार का अशा चर्चा सुरू झाल्या असतानाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते भेटतात, त्यावेळी राजकारणावर चर्चा होतेच, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

चंद्रकांत पाटील काल म्हणाले होते की, ते जर दोन-अडीच तास एकत्र असतील तर नक्कीच चहा-बिस्किटावर चर्चा झाली नसेल. पण ही निर्णयात्मक बैठक नव्हती. यावर आता पाटील यांनी स्पष्टीकरण दिले असून, ते म्हणाले, मी काल म्हणालो होतो की संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना सामनामधील मुलाखतीसाठी विचारले होते आणि हे देखील म्हटले होते की एकसोबत बसून प्रश्न पाहू शकेल. कोणताही उद्देश नसल्याने राजकीय चर्चा देखील झाली नाही.

प्रदेशाध्यक्ष म्हणून मी स्पष्ट करू इच्छितो की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत मिळून सरकार स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. आम्ही सक्रिय विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहोत. आम्ही तिन्ही पक्षांसोबत सरकार स्थापन करू शकता. मात्र ते तिन्ही पक्ष देखील एकत्र राहणार नाहीत. तसे झाल्यास राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असा माझा अंदाज आहे. मात्र असे होईलच हे सांगता येत नाही, असेही पाटील म्हणाले.

दरम्यान, फडणवीसांसोबतच्या भेटीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, राजकीय चर्चा करणे गुन्हा आहे का ? जर दोन राजकीय नेते भेटत असतील तर देशाबद्दल, कृषी विधेयक, जम्मू काश्मीर. चीन, पाकिस्तान, कोव्हिडबद्दल चर्चा होते.