भारतात हाहाकार माजवू शकतो हा आणखी एक चीनी व्हायरस, आयसीएमआरची चेतावणी

भारतासह संपुर्ण देश कोरोना व्हायरसच्या संकटात सापडले असताना, आता आणखी एका चीनच्या व्हायरसचा जगावर धोका निर्माण झाला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) सरकारला चेतावणी दिली आहे की चीनचा कॅट क्यू व्हायरस (Cat Que Virus) देशात पसरू शकतो. या व्हायरसमुळे ताप, मेंदूज्वर असे आजार होऊ शकतात.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, आयसीएमआरच्या पुण्यातील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वायरॉलजीच्या 7 संशोधकांनुसार, चीन आणि व्हिएतनाममध्ये कॅट क्यू व्हायरस आढळला आहे. तेथे डास आणि डुक्करांमध्ये व्हायरस आढळला आहे. भारतात क्यूलेक्स डासांमध्ये कॅट क्यू व्हायरससारखेच काही आढळले असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

संस्थेने म्हटले आहे की, हा व्हायरस प्रामुख्याने डुक्करांमध्येच आढळतो. चीनच्या पाळीव डुक्करांमध्ये या व्हायरसच्या विरोधात अँटीबॉडीज आढळल्या आहेत. म्हणजेच चीनमध्ये हा व्हायरस पसरू लागला आहे. वैज्ञानिकांनी विविध जिल्ह्यांमधून 833 लोकांचे नमुने घेतले. त्यातील 2 मध्ये व्हायरसच्या विरोधातील अँटीबॉडीज आढळल्या. चाचणीत दोन्ही लोकांना एका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले.

आयसीएमआरच्या जून महिन्यात प्रकाशित रिसर्चमध्ये म्हटले आहे की, मनुष्यात व्हायरसविरोधात अँटीबॉडीज आढळणे आणि डासांमध्ये सीक्यूव्हीचे रिप्लकेशन कपॅबिलिटीवरून लक्षात येते की भारतात हा आजार पसरू शकतो. व्हायरस आपल्यात पसरला आहे की नाही हे तपासण्यासाठी मनुष्य आणि प्राण्यांची चाचणी करावी.