हिंद-प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलिया भारतासोबत वाढवणार सहकार्य, चीनला पछाडण्याची तयारी

हिंद-प्रशांत महासागरात चीनला पछाडण्यासाठी ऑस्ट्रेलिया भारतासोबत सहकार्य वाढवणार आहे. ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री लिंडा रेनॉल्ड म्हणाल्या की, आम्ही हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात सुरक्षित आणि मुक्त व्यापाराच्या बाजूने आहोत आणि चीनच्या कोणत्याही दादागिरीला सहन केले जाणार नाही. चीन या संसाधन समृद्ध व्यवसाय क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा विचार करीत आहे.

लिंडा रेनॉल्ड म्हणाल्या की, हिंद महासागर क्षेत्रात भारतीय नौदलासोबत करण्यात आलेल्या युद्धाभ्यासाचा उद्देश चीनला इशारा देण्याचा होता. भारत व त्यासारख्या इतर देशांसोबत ऑस्ट्रेलिया हिंद-प्रशांत क्षेत्रात व्यापक आणि सामरिक भागीदारी करू इच्छित आहे. जेणेकरून चीनवर दबाव टाकता येईल व त्याच्या उद्देशात पुर्ण होण्यापासून रोखता येईल.

भारतीय नौदल आणि ऑस्ट्रेलियाच्या रॉयल नेव्हीने मागील आठवड्यात दोन दिवसीय युद्धाभ्यास पुर्ण केला. हिंद महासागराच्या उत्तर पुर्ण भागात हा अभ्यास यशस्वीरित्या पुर्ण झाला. यावेळी लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर्सचे संचालन झाले. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील हा पहिला मोठा युद्धाभ्यास आहे. जूनमध्ये दोन्ही देशात झालेल्या संरक्षण सहकार्य कराराचा हा एक भाग आहे.

लिंडा म्हणाल्या की, हा भारताबरोबरच्या संबंधांचा सर्वोत्कृष्ट टप्पा आहे. संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले असून, लष्करी भागीदारीही वाढली आहे. भविष्यात भागीदारी अधिक मजबूत होईल.