पायल घोषने घेतली राज्यपालांची भेट, केली ही मागणी

दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात अत्याचाराचा आरोप करत अभिनेत्री पायल घोषने तक्रार दाखल केली आहे. याच पार्श्वभूमीर आज पायलने महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी तिच्यासोबत केंद्रीयमंत्री रामदास आठवले देखील उपस्थित होते. पायल घोषने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत वाय दर्जाची सुरक्षा देण्याची देखील मागणी यावेळी केली. त्यांच्यामध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली.

पायल घोष म्हणाली की, त्यांच्यासमोर आम्ही आमचे म्हणणे मांडले. आम्ही त्यांच्याकडे वाय दर्जाची सुरक्षा देण्याची देखील मागणी केले. त्यांनी आम्हाला चांगल्याप्रकारे कॉपरेट केले.

रामदास आठवले म्हणाले की, पोलीस तक्रारीनंतर देखील अनुराग कश्यपची अद्याप चौकशी झाली नसून, त्या संदर्भात राज्यपालांना निवेदन देण्यात आले.  याआधी काल रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेमध्ये पायल घोषला सुरक्षा देण्याची देखील मागणी केली होती.

दरम्यान, पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात त्याचार केल्याचे आरोप केले असून, ओशिवरा पोलिसात तक्रार देखील दाखल केली. मात्र, अनुरागवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.