वर्ल्ड हार्ट डे, ‘युज हार्ट टू बीट सिव्हिडी’ आहे यंदाची थीम

फोटो साभार करंंट अफेअर

वर्ल्ड हार्ट डे म्हणजे जागतिक हृदय दिन दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. यावर्षी या दिनाची थीम म्हणून ‘युज हार्ट टू बीट सीव्हीडी (कार्डीओ व्हॅस्क्युलर डिसीज) अशी ठेवली गेली आहे. जगभरातील नागरिकांना हृद्यरोग, त्याचे परिणाम आणि हृद्य रोगापासून बचाव करण्यासाठी काय करावे या संदर्भात जागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

हा दिवस २००० सालापासून साजरा करण्याची सुरवात झाली ती वर्ल्ड हार्ट फेडरेशनचे प्रमुख अँटनी बेस देलुना याच्या कल्पनेतून. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सहकार्य केले. वर्ल्ड हार्ट फेडरेशनचे मुख्यालय जिनेव्हा येथे आहे. त्यावेळी हृदय रोगाचा मृत्युदर वर्षाला १७.३ दशलक्ष इतका होता. ताण, मधुमेह, धुम्रपान, स्थूलता आणि अति तेलाचे सेवन यामुळे हृदय रोगाची शक्यता वाढते. त्याबाबत जनतेला सावध केले जावे म्हणून प्रथम सप्टेंबरच्या शेवटच्या रविवारी वर्ल्ड हार्ट डे साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला होता. त्यानुसार पाहिला वर्ल्ड हार्ट डे २४ सप्टेंबर २००० रोजी साजरा झाला. पण २०१४ नंतर एका ठराविक तारखेला तो साजरा करावा असे ठरविले गेले आणि त्यासाठी २९ सप्टेंबर ही तारीख निश्चित केली गेली.

आजकाल आयुष्य धावपळीचे आणि ताणतणावांचे बनले आहे. जीवनशैली असंतुलित बनली आहे. त्यामुळे जगभर हृदय रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे असे आकडेवारी सांगते. आकडेवारी नुसार दरवर्षी हृदयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अन्य रोगांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. मात्र नियमित आहार विहार, व्यायाम, धुम्रपान टाळणे यातून हृदय विकार टाळता येतात याविषयी जागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही