स्पेस स्टेशनवर होणार जाहिरात शुटींग

फोटो साभार पत्रिका

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि स्कीन केअर कंपनी एस्टी लॉडर(Este Lauder) यांच्यात झालेल्या कराराने एक नवे रेकॉर्ड नोंदविले गेले आहे. या करारानुसार प्रथमच स्कीन केअर कंपनी त्यांच्या उत्पादनाच्या व्यावसायिक जाहिरातीचे शुटींग आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर करणार आहे. यासाठी ९४ लाख रुपये म्हणजे (१.२२ लाख डॉलर्स) खर्च केला जाणार आहेच पण शुटींग मध्ये सहभागी होणाऱ्या महिला अंतराळवीरांना ताशी १७५०० डॉलर्स म्हणजे १२.८४ लाख रुपये दराने मानधन दिले जाणार आहे.

या शुटींग साठी नासा एस्टी लॉडर स्कीन केअर क्रीमच्या दहा बाटल्या अंतराळात पाठविणार असून आंतरराष्टीय स्पेस स्टेशनवर होत असलेली ही सर्वात मोठी व्यावसायिक अॅक्टीव्हीटी आहे. स्टेशनच्या सूक्ष्मजीव पर्यावरणात सौंदर्यप्रसाधने जाहिरात शुटींग होणारा हा व्हिडीओ कंपनीच्या नाईट रिपेअर स्क्रीम साठी वापरला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे यात अंतराळवीर महिलांचा चेहरा दिसणार नाही. कारण ते नासाच्या धोरणाच्या विरुध्द आहे. त्यामुळे सर्व प्रोटोकॉल पाळून एका नॉर्थरोप ग्रूमसिग्नस स्पेस क्राफ्ट मध्ये बसून अंतराळ स्टेशनवर कंपनी उत्पादनाचे चित्र व्हिडीओ करणार आहे.

या जाहिरातीमुळे अंतराळ स्टेशनचा वापर मनोरंजन, मार्केटिंग साठी केला जाऊ शकतो असे संकेत दिले गेले आहेत. यापूर्वी नासाने प्रसिद्ध कंपनी आदिदास बरोबर करार केला असून कपडे आणि स्निकर्स अंतराळवीर ट्राय करून पाहणार आहेत. अन्य एका स्पेस डील मध्ये रिअॅलिटी टीव्ही शो विजेत्याला २०२३ मध्ये अंतराळ स्टेशनवर पाठविले जाणार आहे असेही समजते.