सॅमसंगने भारतात लाँच केला दमदार ‘गॅलेक्सी टॅब ए7’, जाणून घ्या किंमत

दक्षिण कोरियाची टेक्नोलॉजी कंपनी सॅमसंगने भारतात गॅलेक्सी टॅब ए7 ला लाँच केले आहे. या टॅबला कंपनीने डार्क ग्रे, सिल्वर आणि गोल्ड रंगात सांदर केले आहे. गॅलेक्सी टॅब ए7 च्या सुरुवातीच्या व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये असून, यामध्ये केवळ वायफाय व्हेरिएंट मिळेल. एलटीई आणि वाय-फाय मॉडेलची किंमत 21,999 रुपये आहे.

गॅलेक्सी टॅब ए7 मध्ये 3जीबी आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. मायक्रो एसडी कार्डद्वारे स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येते. टॅबसोबत कंपनी खास ऑफर्स देखील देत आहे. आजपासून टॅबचे बुकिंग सुरू असून, कंपनीची वेबसाईट, प्रमुख रिटेल स्टोर्स आणि ई-कॉमर्स वेबसाईटवरून याची खरेदी करता येईल.

Image Credited – NDTV

गॅलेक्सी टॅब ए7 मध्ये 10 इंच WUXGA+ टीएफटी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. डिस्प्लेमध्ये बेजल्स आहे आणि टॅबलेट मेटल फिनिश देण्यात आले आहे. टॅबमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 7040 एमएएची दमदार बॅटरी देखील मिळेल. स्क्रीन टू बॉडी रेशिओ 80% असून कंपनीनुसार हे टॅबलेट वर्क आणि प्लेसाठी एकदम फिट बसेल. फोटोग्राफासाठी यात रिअरला 8 मेगापिक्सल आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. टॅबलेटमध्ये ऑटो हॉटस्पॉट आणि क्यूक शेअरचे देखील फीचर मिळेल.

Image Credited – ZBT News

टॅबच्या खरेदीवर खास ऑफर्स देखील मिळतील. टॅबच्या बुकिंगवर कीबोर्ड कव्हर 1875 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, ज्याची किंमत 4499 रुपये आहे. आयसीआयसीआयचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्यास 2000 रुपये कॅशबॅक देखील मिळेल. याशिवाय दोन महिन्यांसाठी युट्यूब प्रिमियमचे स्बस्क्रिप्शन देखील मोफत देण्यात आलेले आहे.