व्हिडीओ : … अन् 50 हजार लीटर वाइन रस्त्यावर वाहून गेली

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण हैराण आहेत, तर ज्यांना वाइन आवडते त्यांना दुःख वाटत आहे. कारण एका रेड वाइनची बाटली किती महाग असते, हे मद्यपींना नक्कीच माहित असते. मात्र व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हजारो लीटर वाइन वाहून जाताना दिसत आहे.

हा व्हिडीओ स्पेनमधील असल्याचे सांगितले जात आहे.  व्हिडीओमध्ये दिसत आहे की, 1, 2 किंवा 10 लीटर नाही तर तब्बल 50 हजार लीटर वाइन पाण्याप्रमाणे वाहून चालली आहे. रेड वाइनने भरलेला एका मोठा कंटेनर फुटल्याने हजारो लीटर वाइन रस्त्याने वाहून गेली. ट्विटर युजर Radio Albacete ने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

49 सेंकदांच्या या व्हिडीओ आतापर्यंत जवळपास 1 कोटी लोकांनी बघितले आहे. अशाप्रकारे हजारो लीटर वाइन वाया गेल्याने तळीराम दुःख व्यक्त करत प्रतिक्रिया देखील देत आहेत.