सुशांत प्रकरणात सीबीआय काय निकाल देते याची आम्ही देखील वाट पाहतोय – अनिल देशमुख

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. हे प्रकरण आता ड्रग्स कनेक्शनकडे वळाले असून, आतापर्यंत अनेकजणांना यात अटक करण्यात आलेले आहे. याच पार्श्वभूमी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर बोलताना आम्ही देखील सीबाआय या प्रकरणावर काय निकाल देते याची वाट पाहत असल्याचे म्हटले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस प्रोफेशनलरित्या करत होते. मात्र हे प्रकरण अचानक सीबीआयला सोपविण्यात आले. ते काय शोधात याची आम्ही देखील वाट पाहत आहोत. लोक सुशांतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली, असा प्रश्न विचारत आहेत. आम्ही देखील सीबीआयच्या निकालाची वाट पाहत आहोत.

दरम्यान, दुसरीकडे सुशांतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंह यांना दावा केला आहे की, एम्सच्या टीमने त्यांना सांगितले की सुशांतचा मृत्यू गळा दाबल्याने झाला आहे. विकास सिंह यांच्या या दाव्यावर एम्सचे फॉरेंसिंक प्रमुख सुधीर गुप्ता म्हणाले की, तपास अजून सुरू असून ते जे म्हणत आहेत ते याग्य नाही. आपण केवळ गळ्यावरील निशाण आणि क्राइम सीन पाहून निष्कर्षावर पोहचू शकत नाही. यात तपासाची गरज आहे.