सुझुकीची नवी जिम्नी फक्त भारतात बनणार

फोटो साभार झिगव्हील्स

जपानी ऑटो कंपनी सुझुकी त्यांची पाच दरवाजे असलेली सुझुकी जिम्नी एसयूव्ही फक्त भारतात उत्पादीत करणार असल्याचे समजते. कंपनीच्या गुरुग्राम येथील कारखान्यात ही एसयूव्ही तयार केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या एसयूव्हीच्या उत्पादनासाठी भारत हे कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग हब असेल असे रिपोर्ट आहेत. त्यासाठीची तयारी सुरु झाली आहे.

सुरवातीला थ्री डोर जिम्नीसाठीचे सुटे भाग आयात करून ही गाडी भारतात असेम्बल केली जाणार आहे पण २०२२-२३ पासून कंपनी पाच दरवाजे असलेल्या जिम्नीचे उत्पादन भारतात सुरु करणार आहे. त्यासाठी स्थानिक व्हेंडर्स बरोबर गेले सहा महिने चर्चा सुरु आहेत.

सुझुकी जिम्नी ही ऑफरोड एसयूव्ही आहे त्यामुळे तिचा ग्राउंड क्लिअरन्स जादा आहे. राउंड हेडलँप, फॉग लँप यामुळे तिचा लुक आकर्षक बनला आहे. भारतात बनणाऱ्या एसयूव्हीना टच स्क्रीन इन्फोटेनमेंट, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, लेन डिपार्चर वॉर्निंग, ड्यूल सेन्सर ब्रेक सपोर्ट असे फिचर्स दिले जातील. या एसयूव्हीला १.२ लिटर पेट्रोल इंजिन दिले जाईल. बी ६ एमिशन नॉर्मसह ही एसयुव्ही असेल.