भारताला मनमोहन सिंग सारख्या पंतप्रधानांची ची कमतरता जाणवत आहे-राहुल गांधी


कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वाढदिवस निमित्त त्यांचे अभिनंदन केले आहे, भारतातील आर्थिक सुधारणांचे शिल्पकार अशी मनमोहन सिंग यांची आठवण राहुल गांधींनी केली आणि म्हटले की त्यांच्यासारख्या पंतप्रधानांची कमतरता देशाला जाणवते आहे

राहुल गांधी यांनी ट्वीट केले की, ‘मनमोहन सिंग यांच्यासारख्या समजूतदार पंतप्रधानांची आज भारताला गरज आहे. त्यांचा प्रामाणिकपणा, सभ्यता आणि समर्पण हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’

२६ सप्टेंबर १९३२ साली जन्मलेले डॉ. मनमोहन सिंग हे 2004 ते 2014 या काळात भारताचे पंतप्रधान राहिले आहेत.ज्यांनी १९९० च्या दशकात आपल्या आर्थिक उदारीकरण धोरणांच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर आणले.