‘पाकव्याप्त काश्मीरचा ताबा कधी सोडणार?’ भारताचा पाकिस्तानला खडा सवाल

भारत आणि पाकिस्तान यांच्यात वादाचा एकाच मुद्दा शिल्लक आहे. तो म्हणजे भारताचा अविभाज्य भाग असलेल्या आणि पाकीस्तानने बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवलेल्या पाकाव्यक्त काश्मीरचा ताबा पाकीस्तान कधी सोडणार, हा आहे, अशा शब्दात संयुक्त राष्ट्र संघाच्या ७५ व्या आम सभेत भारताने ठणकावले आहे. पाकिस्तानचे राज्यकर्ते खोटारडे, दिशाभूल लबाड आणि युद्धपिपासू असल्याचा आरोपही भारताच्या प्रतिनिधीने पाक पंतप्रधानांना दिलेल्या प्रत्युत्तरात केला आहे

पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी आमसभेला उद्देशून केलेल्या ध्वनिमुदीत भाषणात भारतविरोधी राग आळवला. जम्मू क्षनिरच प्रश्न, कथित मानवाधिकार भंग याबाबत भारतावर त्यांनी आरोप केले. पाकिस्तानने उभंय देशातील वाद शांतता आणि सामोपचाराने मिटविण्यास पुढाकार घेतला आहे. मात्र, भारताकडून सकारात्मक प्रतिसाद नसल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या भाषणातील मुद्द्यांचा निषेध करण्यासाठी भारताचे प्रतिनिधी मीजितो विनितो यांनी सभात्याग केला. पाक पंतप्रधानांनी केलेल्या आरोपांना भारताकडून चोख उत्तर देण्यात आले आहे.

जम्मू काश्मीर हा भारताचा केंद्रशासित प्रदेश असून तो भारताचा अभिभाज्या भाग आहे. या भागातील कायदे, नियम ही भारताची अंतर्गत बाब आहे, असे भारताने म्हटले आहे. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांकडे आवर्जून सांगण्यासारखे स्वतःचे काहीही नाही. त्यांच्याकडे दाखविण्यासारखे कर्तृत्व नाही. जगाला उपयुक्त थरातील अशा सूचना नाहीत. त्यामुळे त्यांच्या शब्दात केवळ खोटारडेपणा, दिशाभूल आणि युद्धज्वर भरलेला आहे, अशा शब्दात विनितो यांनी इम्रान खान यांचे वाभाडे काढले.

याच इम्रान खान यांनी कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा ‘शहीद’ म्हणून उल्लेख केला होता. त्यांनीच सन २०१९ मध्ये पाकिस्तानात सुमारे ४० हजार दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांचा वापर भारत आणि अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले करण्यासाठी केला जातो अशी कबुली दिली होती, याची आठवण करून देत विनितो यांनी पाकिस्तानात अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचाराकडेही जगाचे लक्ष वेधले.