दागिने विकून भागवतो न्यायालयीन खर्च: अनिल अंबानी


मुंबई: आपण अत्यंत साधेपणाने जीवन जगात असून आपल्याकडे उल्लेखनीय अशा कोणत्याही मालमत्ता अथवा संपत्ती नाही. पत्नी आणि कुटुंबाकडून आपल्या खर्चाचा भार उचलला जातो, असे रिलायन्स पॉवरचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी इंग्लंडच्या न्यायालयाला सांगितले.

अंबानी यांनी घेतलेले कर्ज थकविल्याप्रकरणी त्यांनी तीन चिनी बँकांना न्यायालयीन कामकाजाच्या खर्चासाठी 716,917,681 डॉलर (रु. 5,281 कोटी) आणि 750,000 युरो (रु. 7 कोटी) दिल १२ जून पर्यंत देण्याचे आदेश इंग्लंडमधील न्यायालयाने दिले होते. मात्र, त्याची पूर्तता करणे शक्य न झाल्याने न्यायालयाने अंबानी यांना त्यांच्या सर्व मालमत्तांचा तपशील देण्याचे आदेश दिले. त्यानुसार अंबानी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयाला माहिती दिली.

आपण अत्यंत साधेपणाने रहात आहोत.पत्नी आणि कुटुंब आपला खर्च उचलत आहेत. आपण आई कोकीलाबेन यांना ५०० कोटी आणि मुलगा अनमोल याला ३१० कोटी रुपये देणे लागतो. आपल्याकडे उत्पन्नाचा इतर कोणताही मार्ग नाही. आणखी खर्च करण्याची वेळ आल्यास आपल्या इतर मालमत्ता विक्री करण्यास न्यायालयाकडून परवानगी मिळण्याची प्रतीक्षा कारण्याखेरीज आपल्याकडे काही उपाय नाही, असे अंबानी यांनी सांगतले.

अंबानी यांच्या खाजगी हेलिकॉप्टरबाबत न्यायालयाने विचारणा केली असता अंबानी म्हणाले की, व्यक्तिगत कारणासाठी त्याचा वापर न केल्यास त्याचा कोणताही खर्च आपल्याला उचलावा लागत नाही. आलिशान गाड्यांच्या ताफ्याविषयायी विचारले असता त्यांनी ही प्रसारमाध्यमांनी पसरवलेली अफवा आल्याचे सांगितले. आपल्याकडे एकही ‘रोल्स रॉईस’ नाही. सध्या आपण केवळ एकाच कार वापरात आहोत, असेही त्यांनी सांगितले.