ड्रग्स प्रकरण : कलाकारांची चौकशी बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी सुरू आहे – संजय राऊत

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. ड्रग्स कनेक्शन प्रकरणात अनेक कलाकारांची नावे समोर येऊ लागली आहेत. अनेकांना अटक देखील करण्यात आले आहे. रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाला अटक केल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रीची नावे समोर आली आहेत. आता एनसीबीकडून सुरू असलेल्या चौकशीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

आज तकशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, बॉलिवूड स्टार्सच्या ड्रग्स कनेक्शनचा तपास सुरू आहे की बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी आणि त्याला संपवण्यासाठी हे सुरू आहे. एनसीबीचे काम ड्रग्स कार्टेल्सचा तपास करणे आहे, जे आंतरराष्ट्रीय सीमेवरून येतात. मात्र ते बॉलिवूडमधील लोकांचा तपास करत आहेत. असे वाटत आहे बॉलिवूडमध्ये काही काम सुरू नाही, येथे फक्त लोक ड्रग्स घेत आहेत. ते बॉलिवूडचे नाव खराब करत आहेत व त्याला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.

संजय राऊत म्हणाले की, ड्रग्स प्रकरणाचा तपास विवेकपुर्ण पद्धतीने केला पाहिजे. जोपर्यंत तुमच्याकडे ठोस पुरावे नाहीत, तोपर्यंत कोणालाही ड्रग्स सारख्या बदनामीचा सामना करावा लागू नये.