IPL 2020 : … म्हणून विराट कोहलीला तब्बल 12 लाखांचा दंड

किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात झालेल्या दारूण पराभवानंतर आता कोहलीला दंड ठोठावण्यात आला आहे. कोहलीला स्लो ओव्हर रेटमुळे 12 लाखांचा दंड झाला आहे. विराटच्या संघाने निर्धारित वेळेत 20 ओव्हर पुर्ण केल्या नाहीत. त्यामुळे पंजाबची इंनिंग उशिरा संपली. आयपीएलच्या नियमांनुसार वेळेवर ओव्हर पुर्ण न केल्यास कर्णधाराला दंड केला जातो. आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये पहिल्यांदाच स्लो ओव्हर रेटमुळे दंड करण्यात आला आहे.

पंजाबविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 6 गोलदाजांचा वापर केला. प्रत्येक गोलंदाने भरमसाठ धावा दिल्या. यावेळी विराट प्रत्येक गोलंदाजासोबत चर्चा करत होता. त्यामुळे प्रत्येक ओव्हर संपण्यासाठी भरपूर वेळ लागला. सोबतच डेल स्टेन आणि उमेश यादव ओव्हर पुर्ण करण्यास भरपूर वेळ घेत होते.

दरम्यान, आयपीएलच्या 6व्या सामन्यात विराटच्या संघाला किंग्स इलेव्हन पंजाबकडून मोठा पराभव स्विकारावा लागला. केएल राहुलच्या शतकाच्या जोरार पंजाबने 20 ओव्हरमध्ये 206 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना विराटचा संघ 109 धावतच गारद झाला. सामन्यात बंगळुरूच्या संघाचा 97 धावांनी पराभव झाला.