IMF कडून पंतप्रधान मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाचे कौतुक

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचे कौतुक करण्यात आले आहे. आयएमएफने म्हटले की, या अभियानांतर्गत जे आर्थिक पॅकेज देण्यात आले, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मदत झाली. हे अभियन खूप महत्त्वपुर्ण आहे.

आयएमएफचे डायरेक्टर गॅरी राइस म्हणाले की, आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत ज्या आर्थिक पॅकेजची कोरोना व्हायरस महामारीनंतर घोषणा करण्यात आली त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी मदत मिळाली व घसरण होण्याचा धोका कमी झाला. त्यामुळे आम्हाला वाटते की हे अभियान महत्त्वपुर्ण आहे.

गॅरी राइस म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताला अधिक महत्त्वपुर्ण भूमिका पार पाडावी लागणार आहे. अशी धोरणे स्विकारली पाहिजेत ज्यामुळे अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकता वाढेल. जर भारताला मेक फॉर वर्ल्डचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक मूल्य साखळीतील महत्त्वपुर्ण धोरणांना प्राधान्य दिले पाहिजे.

ते म्हणाले की, भारताच्या नीति आयोग आणि अर्थमंत्रालयासोबत आयएमएफचा संयुक्त अभ्यास दर्शवतो की आरोग्याशी संबंधित शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारताला आरोग्य क्षेत्रातील एकूण खर्च वाढवावा लागेल.