कोरोना संकटात 3 टप्प्यात होणार बिहारच्या निवडणुका, 10 नोव्हेंबरला मतमोजणी

निवडणूक आयोगाने आज बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा केली असून, या निवडणुका 3 टप्प्यात होणार आहे. कोरोना संकटात होणारी देशातील ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. मतदान प्रक्रिया 28 ऑक्टोंबरला सुरू होतील व 10 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. पहिल्या टप्प्यात 71 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबरला 94 जागांसाठी आणि तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला 78 जागांसाठी मतदान होईल. आजपासून बिहारमध्ये आचार संहिता लागू झाली आहे.

निवडणूक आयोगाने सांगितले की, यंदा सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येईल. मतदानाचा कालावधी यावेळी 1 तास वाढवण्यात आला आहे. उमेदवारांच्या नामांकनासाठी ऑनलाईन व्यवस्था करम्यात आली. कोरोनाचे रुग्ण आणि क्वारंटाईन असलेले देखील मतदान करू शकतील. निवडणुकीच्या तयारीसाठी 46 लाख मास्क, 6 लाख पीपीई किट, 7.2 कोटी सिंगल यूज हँडग्लव्स, 7 लाख सॅनिटायझर्स आणि 23 लाख ग्लव्स उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

बिहारमध्ये विधानसभा मतदारसंघांची संख्या 243 असून, सध्याच्या विधानसभेचे कार्यकाळ 29 नोव्हेंबरला समाप्त होणार आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. लोकांना पोस्टल बॅलेटची देखील सुविधा दिली जात आहे. याशिवाय कोरोनाग्रस्त मतदानाच्या दिवशी अखेरच्या तासात मतदान करतील. त्यांच्यासोबत आरोग्य अधिकारी देखील असतील.