कडुलिंब : उत्कृष्ट अँटीव्हायरल औषध

आपल्या आसपास कडुनिंबाची झाडे विपुलतेने आढळतात. त्यामुळे त्यांचे आपल्याला काही अप्रुप नाही. विशेषत: त्याचे अनेक औषधी उपयोग आपल्याला माहीत नाहीत म्हणून आपल्या भोवताली एवढी लिंबाची झाडे असल्याची आपल्याला काही किंमतही नाही. पण अमेरिकेतलेे शास्त्रज्ञ म्हणतात की या झाडाचे १३० प्रकारचे औषधी उपयोग आहेत. पण अमेरिकेत लिंबाची झाडे दिसत नाहीत. एखादा अमेरिकी जैवतंत्रज्ञ भारतात येतो तेव्हा विपुलतेने दिसणारी कडुलिंबाची झाडे पाहून तो हरखून जातो. अमेरिकी शास्त्रज्ञ कडुलिंबाच्या झाडाला मॅजिक ट्री म्हणतात.

अलीकडे आपल्याही देशात या झाडाचे महत्त्व लोकांना कळले असून त्यापासून काही औषधे तयार करण्यात येत आहेत. सध्या सगळ्या जगालाच सतावणार्‍या विषाणूजन्य आजारांवर तयार करण्यात येणार्‍या औषधांत कडुलिंबाचा वापर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या झाडाचा पाला, बिया म्हणजे लिंबोळ्या, साल, खोड, मूळ असे सारेच घटक औषधी गुणधर्माचे असतात.

आता आता आपल्या देशात लिंबोळीची पेंड खत म्हणून वापरायला लागलेले आहेत. शिवाय लिंबाच्या पाल्याचा अर्क पिकांवर फवारला जात असतो. तो कडू असल्यामुळे तो त्या झाडाच्या अंगात भिनतो आणि त्याचा परिणाम असेपर्यंत त्या पिकावर कसल्याही रोग कीडीचा प्रादुर्भाव होत नाही. लिंबाच्या काडीचा वापर दात घासण्यासाठी केला जातो. मुंबई सारख्या शहरात लिंबाची झाडे कमी आहेत किंबहुना दिसतच नाहीत मात्र शहरातल्या लोकांना सकाळी प्यायला लिंबाच्या पानाचा अर्क लागतो. म्हणून लगतच्या जिल्हतून अनेक आदिवासी दररोज पाला शहरात आणून विकतात.

अलीकडे झालेल्या संशोधनात लिंबाचे पाच नवे गुणधर्म आढळले आहेत. १.कँसरच्या पेशींची संख्या मर्यादित करणे. नियंत्रणात ठेवणे. २. हाडांना मजबुती देणे ३. पचन क्रिया सुधारणे ४.व्हायरल इन्फेक्शन निष्प्रभ करणे आणि ५. बुरशी प्रतिबंधक

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही