गावस्करांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर अनुष्का शर्माने दिले सडेतोड उत्तर

आयपीएलच्या कालच्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा किंग्स इलेव्हन पंजाबकडून दारूण पराभव झाला. या सामन्यात विराटने अनेक कॅच सोडले व धावा देखील केल्या नाही. मात्र विराटच्या खराब कामगिरीवर बोलताना सुनील गावस्कर यांनी अनुष्काचे नाव घेत विराटवर निशाणा साधला होता. कॉमेंट्री करता गावस्कर यांनी विराटच्या कामगिरीवर बोलताना ‘ल़ॉकडाउन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग कि प्रॅक्टिस की इन्होंने’ अशी टिप्पणी केली होती. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर आता अनुष्का शर्माने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अनुष्काने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, मिस्टर गावस्कर, मी तुमचे वक्तव्य हे त्रासदायक होते. मला तुम्हाला विचारायचे आहे की असे वक्तव्य का देता आणि एका क्रिकेटरच्या खेळासाठी त्याच्या पत्नीला का जबाबदार धरले जाते ? मला हे चांगले माहित आहे की तुम्ही मागील अनेक वर्षात प्रत्येक क्रिकेटपटूच्या खाजगी आयुष्याचा आदर केला आहे. त्यामुळे माझ्यासोबत देखील हे व्हायला हवे असे तुम्हाला वाटत नाही का ?

Image Credited – NDTV

अनुष्काने पुढे लिहिले की, तुम्ही इतर शब्दांचा वापर करून देखील माझ्या पतीच्या कामगिरीबाबत बोलू शकला असता. मात्र तुम्ही माझे नाव घेतले, हे योग्य आहे का ? हे 2020 वर्ष आहे आणि माझ्यासाठी अद्याप गोष्टी बदललेल्या नाहीत. कधी असे होईल जेव्हा क्रिकेटमध्ये माझे नाव ओढणे बंद होईल आणि एकतर्फी टिप्पणी केली जाणार नाही ? आदरणीय गावस्कर, तुम्ही एक महान खेळाडू आहात. तुमचे नाव जेटलमनच्या या खेळात नेहमीच उंचीवर राहिल. तुम्ही जे म्हणाला ते ऐकून मला काय वाटले, एवढेच मला सांगायचे होते.

गावस्करांच्या कोहलीवरील टिप्पणीनंतर सोशल मीडियावर त्यांना कॉमेंट्री पॅनेलमधून हटवण्याची देखील मागणी केली जात आहे.