कमालच! तब्बल 4.85 लाखांचा आहे हा स्मार्टफोन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

महागड्या स्मार्टफोन्सचा विषय निघाल्यावर सर्वातप्रथम आयफोनचे नाव आपल्या समोर येते. मात्र आता बाजारात अशा स्मार्टफोनची एंट्री झाली आहे, ज्याच्या किंमतीत तुम्ही 3 आयफोन 11 प्रो मॅक्स खरेदी करू शकता. या स्मार्टफोनचे नाव 8848 M6 Private Customised Dragon Limited Edition आहे. या लग्झरी स्मार्टफोनच्या सुरुवातीच्या व्हेरिएंटची किंमत 4400 डॉलर्स (जवळपास 3.25 हजार रुपये) आहे. तर टॉप व्हेरिएंटची किंमत 6600 डॉलर्स (जवळपास 4.85 लाख रुपये) आहे.

Image Credited – navbharattimes

8848 हा एक लग्झरी स्मार्टफोन ब्रँड आहे. कंपनीने नुकतेच एम6 या स्मार्टफोनला लाँच केले आहे. हा फोन तीन व्हेरिएंट्समध्ये येतो. या फोनच्या सुरुवातीच्या व्हेरिएंटचे नाव Vermilion Cowhide or Azurite Leather आहे.  फोनमध्ये 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज देण्यात आलेले आहे. याच्या डिझाईनमध्ये गोल्ड प्लेटेड टाइटेनियम एलॉयचा वापर करण्यात आलेला आहे. फोनला खास लूक देण्यासाठी नॅचरल डायमंड आणि येलो सफायर सिंथेटिक रुबीचा देखील वापर करण्यात आलेला आहे.

Image Credited – navbharattimes

फोनच्या दुसऱ्या व्हेरिएंटचे नाव Blue Dragon Lizard Skin असून, याची किंमत 5274 डॉलर्स आहे. याच्या डिझाईनमध्ये देखील गोल्ड प्लेटेड टाइटेनियम एलॉयचा वापर करण्यात आलेला आहे. यात 1टीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. फोनच्या तिसऱ्या व्हेरिएंटचे नाव Basalt Crocodile Leather असून, याची किंमत 6600 डॉलर्स आहे. यात देखील 1टीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल.

फोनच्या अन्य स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे तर यात 6.1 इंच एमोलेड डिस्प्लेसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात 64 मेगापिक्सल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात 16 मेगापिक्सल ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. अँड्राईड 10 आउट ऑफ द बॉक्सवर काम करणाऱ्या या फोनमध्ये 4,380mAh बॅटरी देण्यात आलेली आहे. फोनमध्ये 27 वॉट विथ वायर आणि 10 वॉट वायरलेस चार्जिंग सपॉर्ट देखील मिळेल.