गुच्चीवर नव्या जीन्स कलेक्शन मुळे ट्रोल होण्याची पाळी

 

फोटो साभार झी न्यूज

लग्झरी फॅशन ब्रांड गुच्ची (GUCCI)ने नुकत्याच सादर केलेल्या नव्या कलेक्शन मुळे ट्रोल होण्याची वेळ आली आहे. गुच्चीने स्टेन इफेक्ट डेनिम जीन्स आणि ओव्हरऑल बाजारात आणले आहेत. यातील ओव्हरऑलची किंमत १४०० डॉलर्स म्हणजे साधारण १ लाख रुपये आहे तर जीन्सची किंमत १२०० डॉलर्स म्हणजे ८८ हजार रुपये आहे. हे कलेक्शन विंटर कलेक्शनचा भाग असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर स्पेशली ट्रीटेड फॉर स्टेन्ड लाईक डिस्ट्रेस इफेक्ट(डागवाला इफेक्ट) साठी विशेष पद्धतीने या जीन्स तयार केल्याचे म्हटले आहे. या फिकट निळ्या रंगाच्या जीन्सवर बागेत काम करताना जसे मातीचे डाग पडतात तसे डाग आहेत. बायोडायव्हर्सिटी व इकोसिस्टीमचा सन्मान करणाऱ्या प्रक्रियेने तयार केल्याचे कंपनीचा दावा आहे. युजर्सनी मात्र कंपनीच्या या कल्पनेची टर अडविली असून बागेत काम केल्यावर अशी जीन्स आपोआपच मिळेल असे म्हटले आहे. श्रीमंताना कष्ट न करताच कष्टकऱ्यासारखी जीन्स घालण्याची संधी असल्याने काही जणांनी म्हटले आहे.

अर्थात जुने दिसणाऱ्या वस्तू विकण्याची कंपनीची ही पहिलीच वेळ नाही. २०१९ मध्ये कंपनीने स्क्रीन स्निकर्स लाँच केल्या होत्या त्यांची किंमत ८७० डॉलर्स होती. विंटेज स्पोर्ट्सवेअर प्रमाणे हे स्निकर्स दिसत होते.

————-