योगी सरकारचा निर्णय, बलात्कारी आणि छेडछाड करणाऱ्यांना भर चौकात…


उत्तर प्रदेशमध्ये महिलांसोबत घडणाऱ्या अत्याच्याराच्या घटना रोखण्यासाठी योगी सरकारने पावले उचलली असून, अशा गुन्हेगारांना आता उत्तर प्रदेश सरकार सर्वांसमोर बेइज्जत करणार आहे. लहान मुलींचा बलात्कार करणे, छेडछाड करणारे आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या गुन्हेगारांचे पोस्टर्स आता भरचौकात लावले जाणार आहेत. दुष्कर्म करणाऱ्या आणि गुन्हेगारांविरोधात आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ऑपरेशन सुरू केले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुख्यात गुन्हेगारांचे देखील चौकात पोस्टर्स लावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. जेणेकरून, अशा गुन्हेगारांबाबत लोकांना समजेल व समाज त्यांचा बहिष्कार करेल. न्यायालयाने दोषी ठरवलेल्या गुन्हेगारांचाच यात समावेश असेल, असे सांगितले जात आहे.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, महिला आणि लहान मुलींसोबत बलात्कार, छेडछाड, लैंगिक अत्याचार किंवा शोषण करणाऱ्या गुन्हेगारांचे नाव उघड केली जावीत. असे केल्याने या गुन्हेगारांची मदत करणाऱ्यांना देखील बदनामीची भिती वाटेल. महिलांसोबत कोणताही गुन्हा घडल्यास संबंधित बीट इंचार्ज, चौकी इंजार्ज, स्टेशन प्रभारी आणि सीओ जबाबदार असतील. त्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल व त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की, महिलांसोबत कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना महिला पोलीस कर्मचाऱ्याद्वारे दंडित केले जाईल. महिला कर्मचाऱ्यांना अशा गुन्हेगारांना धडा शिकवावा जेणेकरून महिलांसोबत असे कृत्य करण्यास घाबरतील.