नोकरी करणाऱ्यांसाठी मोठे गिफ्ट, ग्रेच्युटीसाठी पाहावी लागणार नाही 5 वर्ष वाट


देशातील संघटित आणि असंघटित कामगारांना सुविधा देण्यासाठी राज्यसभेत नवीन कामगार विधेयकला मंजूरी मिळाली आहे. या नवीन कायद्यामुळे नोकरी करणाऱ्यांना फायदा होणार आहे. आता नोकरी करणाऱ्यांना ग्रेच्युटीसाठी 5 वर्ष वाट पाहावी लागणार नाही. ग्रेच्युटी 5 वर्षांऐवजी आता 1 वर्षात मिळणार आहे.

सध्या ग्रेच्युटी लाभ घेण्यासाठी एकाच कंपनीत 5 वर्ष काम करणे गरजेचे  आहे. मात्र नवीन तरतुदींनुसार, आता कंत्राटावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारासोबतच ग्रेच्युटीचा फायदा मिळेल. कामगारांचे कॉन्ट्रॅक्ट कितीही दिवसांचे असले तरी याचा फायदा मिळणार आहे.

ग्रेच्युटी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना दिली जात. याची कमाल सीमा 20 लाख रुपये आहे. ग्रेच्युटीसाठी 26 कार्यदिवस समजले जातात. तुमच्या नोकरीच्या एकूण वर्षाला 15 ने गुणले जाते. ग्रेच्युटी ही अखेरचा (पगारX नोकरीचा कालावधीX15/26) अशी मोजली जाते.