जेवढे जवान पुलवामात पाकने मारले नाहीत, त्यापेक्षा जास्त भिवंडी दुर्घटनेत लोक मेले, कंगनाची पुन्हा शिवसेनेवर टीका


अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेमध्ये मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेले वाकयुद्ध क्षमण्याचे कोणतेही चिन्ह नाहीत. आता पुन्हा एकदा कंगनाने भिवंडी इमारत दुर्घटनेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महानगरपालिकेवर जोरदार टीका केली आहे. एवढे जवान पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानने मारले नाहीत, त्यापेक्षा जास्त लोक या घटनेत तुमच्या बेजबाबदारपणामुळे मेले असल्याचे, कंगनाने म्हटले आहे.

भिवंडीत इमारत कोसळल्याने घडलेल्या दुर्घटनेत आतापर्यंत मृतांचा आकडा 40 च्या पुढे गेला आहे. यावरूनच टीका करताना कंगनाने, माझे घर तोडण्याऐवजी, या इमारतीवर लक्ष दिले असते तर लोकांचे प्राण वाचले असते असे म्हणत मुंबई महापालिकेवर निशाणा साधला आहे.

कंगनाने ट्विट केले की, उद्धव ठाकरे, संजय राऊत जेव्हा मुंबई महानगरपालिका बेकायदेशीररित्या माझे घर तोडत होते, त्यावेळी या इमारतीकडे लक्ष दिले असते तर आज जवळपास 50 लोक जिंवत असते. एवढे जवान तर पुलवामामध्ये पाकिस्तानने मारले नाहीत, जेवढे निष्पाप लोकांचा तुमच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाला. देवालाच माहित मुंबईचे काय होईल.

दरम्यान, भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 40 च्या पुढे गेला असून, काल दिवसभरात घटनेच्या 60 तासानंतर ढिगाऱ्याखालून 12 मृतदेह बाहेर काढले.