हार्ले डेव्हिडसनने भारतातून गुंडाळला गाशा, फॅक्ट्री केली बंद


लोकप्रिय अमेरिकन दूचाकी कंपनी हार्ले डेव्हिडसनने भारतातील आपली फॅक्ट्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बाईकच्या कमी विक्रीमुळे कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कंपनी लवकरच स्थानिक दूचाकीसोबतच्या भागीदारीची घोषणा करू शकते. ही कंपनी हिरो मोटरकॉर्प असण्याची शक्यता आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हार्ले डेव्हिडसन भारतातील आपला व्यवसाय कमी करत आहे. याशिवाय कोरोना व्हायरस महामारीमुळे व्यवसाय मंदावल्याने कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमी केल्याचे सांगितले जाते. कंपनीची फॅक्ट्री हरियाणातील बावल येथे होती.

जगभरातील कंपनीच्या कर्मचाऱ्यांची कपात, नवीन धोरणे हे सर्व नवीन सीईओ जोचेन झिट्झ यांच्या नवीन योजनेचा भाग असल्याचे सांगितले जाते. कंपनीने सांगितले की, ग्राहकांसाठी भारतातील आमची सेवा सुरूच राहील. तसेच नवीन वाहनांची देखील विक्री केली जाईल. आम्ही आमच्या बिझनेस मॉडेलमध्ये बदल करत असून, उत्पादन सुविधा बंद करत आहोत.