अवघ्या 1 रुपयात घरी घेऊन जा दूचाकी, ही बँक देत आहे सुविधा


सणाच्या काळात जर तुम्ही बाईक अथवा स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. फेडरल बँकेने एक खास सुविधा सुरू केली असून, ज्याअंतर्गत ग्राहक केवळ 1 रुपयामध्ये दुचाकी खरेदी करू शकतात. फेडरल बँकेने ग्राहकांना डेबिट कार्ड ईएमआयवर बाईक अथवा स्कूटर खरेदी करण्याची सुविधा दिला आहे. फेडरल बँकेचे कार्ड असणारे ग्राहक या खास ऑफरचा फायदा घेऊ शकतात.

ग्राहक हिरो मोटोकॉर्प, होंडा मोटारसायकल्स आणि टिव्हीएस मोटरच्या देशभरातील 947 शोरुम्सपैकी कोणत्याही शोरुममधून 1 रुपया भरून दूचाकी खरेदी करू शकतात. बँकेनुसार यासाठी कोणतेही कागदपत्र आवश्यक नाही व बँकेत जाण्याची देखील गरज नाही. ही पुर्ण प्रक्रिया ऑनलाईन होईल. याशिवाय प्रोसेसिंग फी देखील लागणार नाही.

डेबिट कार्ड ईएमआय भरण्यासाठी ग्राहक 3/6/9/12 महिन्यांपैकी एक पर्याय निवडू शकतात. फेडरल बँकेचे ग्राहक या सुविधेसाठी पात्र आहेत की नाही याची माहिती घेण्यासाठी ‘DC-स्‍पेस-EMI’ लिखकर ‘5676762’ नंबरवर एसएमएस पाठवू शकतात. याशिवाय ‘7812900900’ या क्रमांकावर मिस्ड कॉल देखील देऊ शकतात. याशिवाय ग्राहकांना कॅशबॅकची देखील ऑफर मिळत आहे.